रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

प्राण्यांशी कौर्य प्रतिबंध विधेयक कायदा एकमताने मंजूर

ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या बैलगाडीच्या शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभेत प्राण्यांशी कौर्य प्रतिबंध विधेयक कायदा एकमताने मंजूर झाला आहे.
 
शर्यतीदरम्यान प्राण्यांसंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि प्राण्यांना यातना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे आता गावागावांमध्ये पुन्हा एकदा सर्जा-राजाची जोडी शर्यतीत धावताना दिसणार आहे. मात्र, बैलगाडा शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी हे विधेयक विधानसभेत मांडलं आणि एकमताने मंजूर झालं.