1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मार्च 2017 (10:23 IST)

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, 11 जण ठार

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात गाडीतून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच 11 जण  प्राण गमवावे लागले. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावर उरळी कांचनजवळ पहाटे 4 च्या सुमारास घडली. इनामदार वस्तीजवळ रस्त्यावर समोरून डुक्कर आडवे आल्याने टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि बस बाजूनच्या कठड्याला धडकली. यानंतर बस कठडा तोडून समोरून येणाऱ्या ट्रकलाही जोरदार ठोकर दिली. अपघातग्रस्त ट्रॅव्हलर सोलापूरहून पुण्याकडे जात होती. तर ट्रक पुण्याहून सोलापूरकडे जात होती. मृतांमध्ये मुलुंडच्या 9 जणांचा समावेश आहे तर 2 जण नारायण गावचे रहिवासी आहेत. यामध्ये 6 महिला तर 5 पुरुषांचा समावेश आहे. विजय काळे, ज्योती काळे, योगेश लोखंडे, जयवंत चव्हाण, योगिता चव्हाण, रेवती चव्हाण, जगदीश पंडीत , शैलजा पंडीत , प्रदीप अवचट, सुलभा अवचट यांचा समावेश आहे.