बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (17:03 IST)

माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही - अमोल मिटकरी

गेल्या काही दिवसांपासून विधान परिषद आमदार अमोल मिटकरी आणि गोपीचंद पडळकर यांच्यात तुफान टोलेबाजी सुरू आहे. अशातच मिटकरी यांनी पुन्हा पडळकर यांचं नाव न घेता त्यांच्यावर आक्रमक टीका केल्याचं दिसून आलं.
 
"तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही," अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी पडळकर यांचं नाव न घेता निशाणा साधलाय.
 
तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी यावेळी समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे, असं मिटकरी म्हणाले. सांगली येथे आयोजित एका व्याख्यानादरम्यान मिटकरी बोलत होते.
 
जेजुरीमध्ये अहिल्याबाई होळकर पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमावरून पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांच्याविरुद्ध आक्रमकपणे प्रतिक्रिया देत आहेत.
 
"आम्हाला ज्यांनी आमदार केलं आहे ते आमचे गुरुही काही कमी नाहीत. विरोधासाठी विरोध नाही करायचा. शांत बसायचं. पण टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम वाजवायचा," असं मिटकरी यावेळी म्हणाले
 
"तुम्हाला काय वाटतं, हे सोपं असतं. एखादं श्वान बैलाच्या मागे भूंकतं. बैल एकदा, दोनदा ऐकतो, तिसऱ्यांदा मात्र लाथ मारतो. बैलाने लाथ मारल्यानंतर कुत्रा मागेच जातो," असा शब्दांत त्यांनी टोला लगावला.