1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Candidates who wish to send papers in 56th National Conference are invited to register

56 व्या राष्ट्रीय परिषदेत पेपर पाठवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रा. राम ताकवले संशोधन केंद्र व शिक्षणशास्त्र विद्याशाखा आणि इंडियन असोसिएशन ऑफ टीचर एज्युकेटर्स (IATE) यांच्या संयुक्त विद्यमाने आयएटीई ची 56 वी राष्ट्रीय परिषद यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे दि. 10 ते 12 फेब्रुवारी 2024रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर परिषदेचा विषय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 (National Education Policy-2020)  मधील महत्त्वपूर्ण संकल्पना “भारतीय ज्ञान प्रणाली (IKS): शिक्षक, शिकवणे आणि शिकणे” (Indian Knowledge System (IKS): Teacher, Teaching and Learning) असा आहे.
या परिषदेत पेपर पाठवू इच्छिणाऱ्या ज्या उमेदवारांनी अजूनही नोंदणी केलेली नसेल त्यांनी तातडीने https://ycmou.digitaluniversity.ac/downloads/IATE%20Brochure.pdf  या लिंक वर क्लिक करून  नोंदणी करावी असे आवाहन  संयोजकांनी केले आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor
पुढील लेख
येवल्यातील जनतेने माझा 'नायलॉन मांजा' सारखा दोर पक्का केलाय-छगन भुजबळ