शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (17:39 IST)

येत्या 3 दिवसांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
 
हवामान विभागाच्या अंदाजनुसार विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आला आहे. 
 
राज्यातील येथे पाऊस येणार
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात सातारा, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सागंली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आले असून उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे.
 
तर शनिवारी वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, आणि गडचिरोली जिल्ह्यात यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात शनिवारी इतर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवण्यात आला आहे.
 
रविवारी आणि सोमवारी अर्थातच 29 आणि 30 ऑगस्टला राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवण्यात आला आहे.