1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. chandrapur district four farmer women died due to lightning

वीज कोसळून 4 महिलांचा मृत्यू

चंद्रपूरमध्ये मोठी धक्कादायक घटना, चार शेतकरी महिलांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्या शेतात काम करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.
 
हिरावती शालिक झाडे, पार्वता रमेश झाडे, मधुमती सुरेश झाडे, रीना नामदेव गजभे अशी या घटनेत मृत पावलेल्या महिलांची नावे आहेत. या सर्व शेतकरी महिला वरोरा तालुक्यातील वायगावातील रहिवासी आहेत. या घटनेची माहिती परिसरात पसरताच गावातील नागरिकांधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
पुढील लेख
आजचा सोन्याचा भाव