शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (08:38 IST)

छत्रपती संभाजीराजे यांचा ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ शब्दाला पाठिंबा

sambhaji raje
जालना : देशातील विरोधकांच्या आघाडीने त्यांच्या आघाडीच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘इंडिया’ असा केल्यानंतर या नावावरून चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्यात आता आगामी जी 20 परिषदेसाठी देशांना पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असे लिहिण्यात आले आहे.

यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहे. यावरुन काँग्रेसने भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. तर छत्रपती संभाजीराजे यांनी मात्र, या निर्णयाचे स्वागत केले आहे. इंडिया शब्द बदलून भारत करणार असेल, तर काही चुकीचे नाही, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
 
जी-20 ची बैठक 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानावर होणार आहे. या बैठकीच्या डिनरला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती भवनातून निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. सरकारने निमंत्रण पत्रिकेत देशाचे नाव बदलल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. सरकारने निमंत्रण पत्रिकेत ‘इंडिया’ ऐवजी ‘ भारत’ लिहिल्याचा आरोप जयराम यांनी केला आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor