गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (07:45 IST)

चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांना टोला

Chitra Wagh's
संजय राऊतांच्या अस्वस्थतेमुळे महाविकास आघाडीत किती आलबेल आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरुन दिसतं असा टोला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीकाही केली आहे. त्याचबरोबर सहा आठवड्यांचं अधिवेशन घेऊन मग विरोधकांच्या भूमिकेवर बोला असंही त्या म्हणाल्या आहेत.
 
आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ म्हणतात, संजय राऊत अस्वस्थेमुळे महाविकास आघाडीत किती आलबेल आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांमुळे दिसतं. एकच कोडं आहे, कुणीही हरामखोर म्हटलेलं नसताना मी हरामखोर नाही हे का सिद्ध करावं लागतंय? संजय राऊत, माझं आवाहन आहे की तुम्ही सहा आठवड्यांचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं असं सांगितल आहे.