शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 27 जून 2021 (18:02 IST)

प्रताप सरनाईकांविषयी लवकरच बातमी मिळेल - संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसान पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले, "प्रताप सरनाईकांविषयी लवकरच बातमी मिळेल."
 
संजय राऊत यांच्या या सूचक विधानानं राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
 
आधी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानं या चर्चांना आणखीच बळ मिळालंय. उद्धव ठाकरेंशी दोन तास चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी प्रताप सरनाईकांविषयीही संजय राऊतांनी भाष्य केलं.
 
"प्रताप सरनाईक यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनी खुलासा केला आहे की, मी माझ्या भावना व्यक्त केल्या आणि मी आजन्म शिवसेनेतच राहीन, शिवसैनिक म्हणूनच मरेन. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे," असं संजय राऊत म्हणाले.
 
मात्र, शेवटी ते म्हणाले, प्रताप सरनाईक यांच्याविषयी लवकरच तुम्हाला बातमी कळेल.