1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 27 जून 2021 (14:25 IST)

इगतपुरीच्या रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा

Raid on the ongoing rev party at Igatpuri resort maharashtra news in marathi
मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईपासून जवळ असलेल्या इगतपुरी येथे पहाटेच्या सुमारास रिसॉर्ट मध्ये सुरु असलेल्या हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला.या मध्ये 22 तरुणांना रंगे हात पकडले. जे ड्रग्स आणि हुक्क्याचे सेवन करीत होते.

या मध्ये अटक केलेल्या लोकांमध्ये 10 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश असून त्यात मराठी आणि साऊथ चित्रपटातील एक अभिनेत्री चा समावेश देखील आहे. ही अभिनेत्री बिगबॉस मध्ये स्पर्धक होती.आणि एक परदेशी महिलेचा समावेश आहे.तसेच या मध्ये 2 कोरिओग्राफर यांचा समावेश देखील आहे.
 
इगतपुरीमध्ये  मानस रिसॉर्टच्या हद्दीत स्काय ताज व्हिलावर या बंगल्यावर  छापा टाकला. एका बातमीदाराने दिलेल्या माहितीद्वारे ही कारवाई करण्यात आली.या छापे मध्ये पोलिसांना ड्रग आणि कॅश मिळाली आहे.
 
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या निर्देशनात या बंगल्यावर धाड टाकली.अटक केलेल्या सर्वांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.