गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2022 (11:18 IST)

बीडच्या जिल्हा रुग्णालयात राडा, विवाहितेच्या पती, सासूला मारहाण

बीडच्या जिल्हा रुग्णालयात राडा झाल्याची घटना घडली आहे. बीडच्या गजानन नगर परिसरात एका 22 वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. सीमा निलेश राठोड असे या मयत महिलेचे नाव आहे. तिचा मृतदेह बीडच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असता महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी राडा केला आणि महिलेच्या पती, सासूला, आणि नणंदेला रुग्णालयात मारहाण केली. 
 
रुग्णलयात मयत महिलेच्या कुटुंबीयांचा हा राडा अर्धा तास सुरु असल्यामुळे रुग्णालयात इतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.पोलिसांनी मध्यस्थी करून हे भांडण मिटवले. मयत सीमाच्या माहेरच्या मंडळींनी तिच्या सासरच्या लोकांवर छळ  करण्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सीमाने आत्महत्या केली नसून तिचा खून केला आहे. आणि सासरच्या मंडळींना पोलिसांनी अटक करावी तो पर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही असे नातेवाईकांचे म्हणणे होते. या सर्व गोष्टींमुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .पोलिसांनी मध्यस्थी करून हे भांडण मिटवले.पोलीस प्रकरणाचा तपास लावत आहे.