बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 6 एप्रिल 2021 (09:46 IST)

रश्मी ठाकरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray यांना कोरोनाची लागण झाली असून आता उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 
संपादक रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 30 मार्च रोजी त्यांना HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  
 
रश्मी ठाकरे या हॉस्पिटलमधून वर्षा निवास्थानी परत आल्या आहेत. त्यांची तब्येत सध्या चांगली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
23 मार्चला रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना 20 तारखेला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर रश्मी यांची चाचणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.