या लोकांना निर्बंधातून सूट, राज्य सरकारचा नवा आदेश
करोनाचा वाढता उद्रेक बघता राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहे. तरी काही घटकांना यातून सूट देण्यात आली आहे. यात घरकाम करणारे, स्वयंपाकी, परीक्षार्थी, वाहन चालकांना रात्री ८ नंतर तसेच वीकेंड लॉकडाऊन दरम्यान निर्बंधातून सूट देण्यात येत आहे. अर्थात हे लोक शनिवार व रविवार संपूर्ण टाळेबंदीच्या काळात ये-जा करु शकतात.
राज्य सरकारने सोमवारी रात्री नवा आदेश लागू केला आहे. ज्यात सर्व वर्गाना सवलत देण्यात आली असून काही लोक आपल्या कामानिमित्त रात्री ८ नंतर ये-जा करु शकतात. तसेच शनिवार आणि रविवारी संपूर्ण टाळेबंदीच्या काळात देखील कामगार, घरकाम करणारे, वाहनचालक, स्वयंपाकी, परीक्षार्थी यांना सूट असेल. तसेच रात्रीच्या वेळी रेल्वे, विमान प्रवासास मुभा देण्यात आली आहे. या सर्वांसाठी परिस्थितीनीरुप निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला असेल.
सूट
कामगारांना ओळखपत्राच्या आधारे वाहनांमधून प्रवास करता येईल.
रेल्वे, बस किंवा विमानाने निर्बंध असलेल्या वेळेत आगमन होणाऱ्या प्रवाशांना घरी जाता येईल. यासाठी प्रवासाचे तिकीट असणे बंधनकारक असेल.
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बंदीतून सूट देण्यात आली आहे. यासाठी परीक्षेचे हॉल तिकीट सोबत असणे आवश्यक असेल.
विवाह किंवा अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली जाईल.
विवाह शनिवारी किंवा रविवारी असल्यास नियमांचे पालन करुन परवानगी मिळेल.
काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निर्बंधातून सूट मिळाली आहे.