1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (14:41 IST)

शिर्डीत 125 किलो वजनाचा दगड खांद्यावर उचलण्याची स्पर्धा

hanuman sanjeevani booti
शिर्डी- हनुमान जयंती निमित्ताने शिर्डीत वेगवेगळ्या स्पर्धांच आयोजन केले जाते. अशात या वर्षी देखील हनुमान जयंतीच्या निमित्ताने शिर्डीत अनोख्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
येथे हनुमान मंदिरासमोर 125 किलो वजनाचा दगड खांद्यावर घेवून बजरंगबलीची पूजा करण्याची पद्धत आहे. अशात आजच्या दिवशी अनेक तरुण याठिकाणी आपली शक्ती सादर करतात. दरवर्षी तरुण बजरंग गोटा उचलण्यासाठी येथे जमतात.
 
तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी येथे बजरंग गोटा खांद्यावर उचलण्याची स्पर्धात्मक परंपरा आहे. दरवर्षी अनेक तरुण बजरंग गोटा उचलण्यासाठी पुढे आले असून अनेकांनी प्रयत्न केले आहे, त्यात काही तरुणांनाच यश मिळाले आहे.