सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (09:02 IST)

पोहरादेवीला जमलेल्या 10 हजार समर्थकांवर गुन्हा दाखल

वाशिम- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले वनमंत्री संजय राठोड मागील पंधरा दिवसांपासून गायब होते. आता त्यांनी शक्तीप्रदर्शन करत पोहरादेवी गडावर दर्शन घेतले. तेव्हा पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड यांचे सुमारे 10 हजार समर्थक जमले होते. सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूची परिस्थिती बघता अशाप्रकारे गर्दी झालेली बघून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर वाशिम पोलिसांना 10 हजार लोकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
 
पोलिसांनी संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी तेथे गर्दी केलेल्या 10 हजार लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच संजय राठोड प्रकरणी शरद पवार नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड हे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर 15 दिवसांनी प्रथमच माध्यमांसमोर आले. या प्रकरणी अकारण गोवण्यात येत असल्याचा दावा केला आहे. संजय राठोड तिथे दर्शनाला येणार आणि 15 दिवसांनंतर पहिल्यांदाच समोर येणार हे कळताच त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला.