Last Modified शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (16:36 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आता आषाढवारीनंतर पंढरपूरची माघीवारीही रद्द करण्यात आलं आहे. कोरोनामुळे पंढरपूर शहरासह 10 गावांमध्ये संचारबंदी देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे आषाढी वारीनंतर आता माघी वारीही रद्द करण्यात आलीये. पंढरपूर शहरासह शेजारच्या दहा गावांमध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आलेत. 22 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून 23 फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी असणार आहे.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबादचे आदेश काढले आहेत.