शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 जानेवारी 2026 (17:41 IST)

महाराष्ट्र मध्ये वोटिंगच्या नावाखाली अनेक ठिकाणी गोंधळ

महाराष्ट्र मध्ये वोटिंगच्या नावाखाली अनेक ठिकाणी गोंधळ
आज १५ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान होत असताना, राज्यभरातून अनेक ठिकाणी गोंधळ आणि तांत्रिक अडचणींच्या बातम्या समोर येत आहे. तसेच मुंबई आणि पुण्यासह अनेक ठिकाणी मतदारांनी तक्रार केली आहे की, मतदानानंतर बोटाला लावली जाणारी 'शाई'  सहज पुसली जात आहे. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर टीका केली आहे.  
तसेच राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते अंकुश काकडे यांनी आरोप केला की, काही मशिन्समध्ये तीन मतदानानंतर चौथ्या वेळी लाईट लागला नाही. तसेच, मशिन्सची वेळ १४ मिनिटे पुढे असल्याचाही दावा त्यांनी केला. तर नाशिकच्या प्रभाग २४ आणि २९ मध्ये, तसेच सोलापूरच्या आयटीआय कॉलेज केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान अर्धा ते एक तास उशिरा सुरू झाले.
 
तसेच अहिल्यानगर  प्रभाग ३ मध्ये बोगस मतदार पकडल्याच्या कारणावरून पोलीस आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये मोठी खडाजंगी झाली.
 
मालेगावमध्ये प्रभाग ९ मध्ये एका महिलेचे मत तिच्या आधीच कोणीतरी दिल्याचे समोर आल्याने तिथे मोठा गोंधळ उडाला.तसेच शिरवणे येथील एका मतदान केंद्रात कोब्रा साप शिरल्याने मतदारांची पळापळ झाली. सर्पमित्राने सापाला पकडल्यानंतर काही काळाने मतदान पुन्हा सुरू झाले.
तसेच निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, जिथे तांत्रिक बिघाड झाला तिथे मशिन्स बदलून देण्यात आल्या आहे आणि तक्रारींची दखल घेतली जात आहे.
Edited By- Dhanashri Naik