1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (11:25 IST)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला

औरंगाबादच्या क्रांती चौकात येत्या 10 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्या पूर्वी पुतळ्याच्या उदघाटनाबद्दल औरंगाबाद येथे वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने या पुतळ्याचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाने करावे अशी मागणी केली जात आहे. तर या पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याची मागणी महापालिका करत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा उदघाटनाच्या पूर्वीच वादाच्या भवऱ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराजांचा अश्वारूढ पुतळा औरंगाबादच्या क्रांतिचौकात स्थापित झाला असून त्याचे अनावरण येत्या 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे.