मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (10:47 IST)

'हिटलरचा बाप' हॅशटॅग वापरून जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

What did Jitendra Awhad say using the hashtag 'Hitler's father'? 'हिटलरचा बाप' हॅशटॅग वापरून जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?Marathi Regional News  In webdunia Marathi
रेल्वे परीक्षांच्या निकालावरून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे.
 
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पाटणा येथील 'भिखना पहाडी' परिसरात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. संतप्त विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या डब्याला आग लावली. यामुळे बिहार आणि नंतर उत्तर प्रदेशात आंदोलन तीव्र झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
 
जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्वीट करत 'हिटलरचा बाप' असं हॅशटॅग वापरलं आहे.
ते म्हणाले, "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची 'संपत्ती' जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडे संपत्ती असती तर ते नोकरीसाठी रस्त्यावर उतरले असते का? बहुधा त्यांची पेनं, पुस्तकं, वह्या जप्त करतील."

आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये ते म्हणाले, "आरआरबी एनटीपीसीच्या परीक्षेसाठी एकूण सीट होत्या जवळपास 38 हजार, अर्ज आले होते तब्बल सव्वा कोटी. हे भयाण वास्तव आहे देशातील रोजगारांचं. बेरोजगारीचा हा स्फोट देशात अराजक माजवू शकतो. वेळीच सावध होवून तरुणांच्या हातांना काम द्या. त्यांच्या स्वप्नांच्या सोबत खेळू नका