रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (09:46 IST)

'जय पवार यांचे कारनामे उघड करणार' किरीट सोमय्यांच्या या इशाऱ्यावर अजित पवार काय म्हणाले?

भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांच्यावर आरोप केले आहेत.

अजित पवार यांची 1055 कोटींची बेनामी संपत्ती जप्त केली आहे. आता जय पवार यांचे कारनामे उघड करणार. त्यांना तुरुंगात जावे लागेल असं वादग्रस्त विधान किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
 
याला प्रत्युत्तर देत अजित पवार यांनी कायदा सर्वश्रष्ठ असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होते. पण काही जण केवळ वक्तव्य करतात. त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही असं म्हटलं आहे.
 
केवळ आरोप करणारे उद्या कोणाचंही नाव घेतील आणि तुम्ही प्रश्न विचारणार हे योग्य नाही असंही ते म्हणाले.