बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (10:07 IST)

चुकीच्या उपचारामुळे पाच निर्दोषांची बळी, आरोपी बोगस डॉक्टरला अटक

मुरबाड येथील धसई प्राथमिक केंद्रात शिपाई पदावरून निवृत्त असून स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाऱ्या बोगस डॉक्टरांचा चुकीच्या उपचारामुळे पाच निर्दोषांचा बळी गेल्यामुळे पर्दाफाश झाला आहे. या बोगस डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करून याला टोकावडे पोलिसांनी अटक केली आहे. पांडुरंग घोलप असे या आरोपीचे नाव आहे. 

आरोपी घोलप हा धसई प्राथमिक केंद्रात शिपाई म्हणून कामाला होता. त्याने आपल्या घरातच दवाखाना उघडून स्वतःला डॉक्टर म्हणून चालवत होता. त्या परिसरातील लोक त्याच्यावर विश्वास ठेवत उपचार घेत होते. 24 जानेवारी आणि 26 जानेवारी रोजी या परिसरातील बारकूबाई वाघ, राहणार चिखलीवाडी धसई येथील आशा नाईक या महिलेवर घोलप याने चुकीचे उपचार केल्यामुळे त्यांच्या मृत्यू झाला. तसेच राम भीमा आसवाले , अलका मुकणे, लक्ष्मण मोरे, यांचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला. 

या बोगस डॉक्टराच्या विरोधात गुन्हा दाखल करत अन्य रुग्णांची चौकशी केली जात आहे. या घटने नंतर आरोपी पांडुरंग घोलप पसार झाला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.