बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (07:48 IST)

तळीरामांमुळे वाईन शॉप्सवर तोबा गर्दी फोटो

शहर परिसरातील सर्व वाईन शॉप्स आणि दारु दुकानांबाहेर तळीरामांनी प्रचंड गर्दी केल्याचे पहायला मिळाले. यामुळे तर काही ठिकाणी चक्क वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला आहे. शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तठोर निर्णय घेण्याचा इशारा प्रशासनाकडून दिला जात असला तरी याकडे तळीरामांनी डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे.

वाईन किंवा दारु घेण्यासाठी केलेल्या गर्दीमुळे कोरोनाच्या सर्वच नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, अनेकांनी मास्कही घातलेले नव्हते. सोशल डिस्टन्सिंगसह अनेक नियमांचा फज्जा उडाला. शनिवार आणि रविवार वाईन शॉप्स बंद राहण्याच्या भीतीने आणि  सायंकाळी ७ वाजता दुकाने बंद होणार असल्याने तळीरामांनी प्रचंड गर्दी केली होती. या साऱ्या बाबींची दखल घेऊन आता प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.