सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (17:33 IST)

दारू विक्रेत्याची क्रूरता, 100 रुपयांसाठी तरुणाचा खून

औरंगाबाद येथे एका दारूच्या अड्ड्यावर काम करणाऱ्या 18 वर्षाच्या तरुणाचा 100 रुपये चोरी करण्याच्या संशयावरून मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना आनंदनगर येथे बुधवारी घडली आहे. शेख अश्फाक उर्फ मुक्या शेख अब्दुल(वय वर्ष 18 )असे या मयत तरुणाचे नाव आहे. तर शेख मुबारक उर्फ बाबा शेख हैदर (38)असे या संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीने तरुणाचा मृतदेह दुचाकीवर ठेऊन कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पहाटेच्या सुमारास फेकला. कारगिल मैदानाजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक मृतदेह पडलेला काही नागरिकांना दिसला. त्यांनी याची माहिती पुंडलिक नगर पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी गेल्यावर त्यांना मृतदेहावर मारहाण केल्याचे व्रण दिसून  खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी घटनास्थळीवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर मयत तरुणाची ओळख पटवून त्याच्या कुटुंबीयांचा शोध लावला. त्यांनी सांगितले की मृत हा शेख मुबारकच्या अवैध असलेल्या दारूच्या अड्ड्यावर गेल्या 5 -6 वर्षा पासून कामाला होता. पोलिसांनी शेख हैदर याला दम दाखवून उलट तपासणी केल्यावर त्याने शेख अशफाक याचा मृत्यू मारहाणी मुळे झाल्याचे कबूल केले. मला शेख अब्दुलवर त्याचा वर मला पैसे चोरी करत असल्याचा संशय होता. 100 रुपये चोरी केल्याच्या संशयावरून मी त्याला मारहाण केली. मी त्याला लाकडाच्या दांड्याने मारले.या मारहाणीत त्याला जबर घाव लागला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचे मृतदेह दुचाकीवर नेऊन कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकले. असे आरोपी शेख मुबारक यांनी सांगितले. आरोपी शेख मुबारकला पुंडलिक नगर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला आहे.