शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (15:35 IST)

शरद पवार हे ज्येष्ठ आहेत, पण श्रेष्ठ नाहीत : पडळकर

भाजपने आता 'मिशन महाराष्ट्र' हाती घेतलं आहे.  'युपी झांकी है, महाराष्ट्र बाकी है' अशा घोषणा देत भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याला सूचक उत्तर दिलं आहे. 'महाराष्ट्र बाकी आहे असं म्हणत असाल तर महाराष्ट्र तयार आहे,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.  निकालांचा महाराष्ट्रात कुठलाही मोठा बदल होणार नाही. मोठ्या बदलासाठी भाजपला आणखी काही वर्षे थांबावं लागेल, असं पवार म्हणाले. 
 
शरद पवार यांनी दिलेल्या या वक्तव्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोचरी टीका केली आहे. 'शरद पवार हे ज्येष्ठ आहेत, पण श्रेष्ठ नाहीत. त्यांच्या विषय म्हणजे काहीजरी केलं तरी मीच केलं, माझ्यापेक्षा कोण पुढे जाता कामा नये, पण असे दहा-वीस शरद पवार देवेंद्र फडणवीस  खिशात घालून फिरतात' 
 
शरद पवार यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचं आहे. विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधातील भूमिका जी शरद पवार यांच्याकडे आहे, तसले विषय सोडून त्यांच्या पुढचं नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आहे, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.