रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , सोमवार, 9 मे 2022 (16:56 IST)

नागपुरातील महाकाली नगरमधील झोपडपट्टी येथे सिलेंडरचा स्फोट भीषण आग; अनेक कुटुंब उघड्यावर

Explosion
नागपूरच्या महाकाली नगरमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यावेळी सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे. नागपूर शहराच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची घटना घडली आहे. एका-मागे एक असे अनेक सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती पुढे आली आहे. सुरुवातीला एका झोपडीत आग लागल्यानंतर शेजारच्या अनेक झोपड्या देखील जळाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांना आग विझविण्यात यश मिळाले आहे.आग सकाळी 9 वाजताच्या सुमारास लागली, सुरुवातीला नागरिकांनीचं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले,मात्र एकाला-एक झोपड्या लागून असल्याने बघता बघता आगी पसरत गेली,ज्यांमुळे अनेक घरातील समान जळून राख झाले आहे. आग नेमकी कश्यामुळे आणि कुठे लागली या संदर्भात अद्याप खुलासा झालेला नाही,मात्र आगीच्या घटनेत अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.