सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (11:54 IST)

सिलेंडरच्या स्फोटात 24 घरे जळून खाक

सिलेंडरच्या स्फोटाने कराड येथील बापूजी साळुंखे पुतळा परिसर हादरून गेला. इथल्या वस्तीत शनिवारी पहाटे भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि या आगीत सिलेंडरने पेट घेत त्यात मोठा स्फोट झाला. या आगीत 24 घरे जळून खाक झाली पण सुदैवाने इथल्या महिलांसह न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कराडच्या न्यायालयाच्या बाजूच्या बापूजी साळुंखे पुतळा परिसरात असलेल्या वस्तीत मध्यरात्री घडली. एका घराला लागलेल्या आगीमुळे ती वाढून आगीच्या भडक्यात चार घरातील सिलेंडरने पेट घेत मोठा स्फोट झाला आणि त्यात 24 घरं मय साहित्याच्या जळून खाक झाले. आग लागलेली पाहता महिलांनी आरओरड करत रस्त्यावर आल्या. सिलेंडरच्या स्फोटाचा जोरदार आवाज आल्याने परिसरात खळबळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांसह प्रयत्न केले. अग्निशमन दलाचे बंब या ठिकाणी दाखल झाले. त्यांचे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु झाले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत झालेल्या नुकसानीमुळे अनेक घर उघड्यावर आले आहे.