सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (10:15 IST)

आमदाराकडून महिलेला बेदम मारहाण, आमदाराच्या विरोधात तक्रार दाखल

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर येथे गोदावरी कालोनीत एका शिवसेनेच्या आमदार ने कुटुंबियांसह एका महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला आपल्या पतीसह एका नातेवाईकाकडे श्राद्धाच्या कार्यक्रमास गेल्या होत्या. या कार्यक्रमातच शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांनी पीडित  महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणात आरोपी आमदार रमेश आणि त्यांच्या सह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महिलेला जबर मार लागला असून त्याच्या पाठीवर आणि शरीरावर मारहाण केल्याचे व्रण आले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादतील वैजापूर तालुक्यात सटाणा या ठिकाणी गुरुवारी भाजपच्या शाखेचं उदघाटन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी आमदार रमेश बोरनारे यांच्या चुलत भावजय जयश्री बोरनारे या उपस्थित होत्या. जयश्री यांनी डॉ. कराड आणि माजी नागराध्यक्षांचे सत्कार केले. रमेश  बोरनारे यांना त्यांच्या भावजय ने विरोधी पक्षाच्या नेत्याचं सत्कार करणे आवडले नाही. या रागात त्यांनी आपल्या भावजय जयश्री यांना कार्यक्रमाला का गेला असं म्हणत शिवीगाळ करत जयश्री यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आणि जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेला रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या वर उपचार करण्यात आले पीडित महिलेने आरोपींच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी आमदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास करत आहे.