1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (08:24 IST)

मुख्यमंत्री आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवर चर्चा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली. राज्यातील आगामी अर्थसंकल्प अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेस नेत्यांना निधी मिळण्याबाबत असलेल्या नाराजीबाबत चर्चा झाली आहे. दरम्यान या दोन नेत्यांमधी काय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही आहे.
 
राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांवर वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. केंद्रीय तपाय यंत्रणांचा वापर करुन भाजप महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. असून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना ईडीद्वारे निशाणा करण्यात येत आहे. राज्य सरकारमधील काँग्रेसच्या आमदारांना निधी मिळण्याबाबत कुरघोडी होत आहेत. तसेच ऊर्जा विभागात येत असलेल्या अडचणींबाबत काँग्रेसच्या मंत्र्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच या भेटीमध्ये निधी वाटपावरुन अर्थमंत्री अजित पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली.