1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (09:42 IST)

छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा औरंगाबाद येथे

औरंगाबाद येथील क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या अश्वारूढ पुतळा 21 फुटी असून या पुतळ्याची पूर्ण उंची 52 फूट आहे. या पुतळ्याचे वजन 7 मेट्रिक टन असून पुतळ्यासाठी ब्रॉन्झ धातूचा वापर करण्यात आला आहे. पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची 31 फूट तर चौथऱ्यासह पुतळ्याची उंची 52 फूट आहे. हा चौथरा आर सीसी ने बांधला गेला असून त्याच्या भोवती स्टोन क्लन्डिंग केले आहे. याचा भोवती 24 कमानीत 24 मावळ्यांच्या प्रतिकृती बसविल्या आहेत. याच्या भोवती कारंजे तयार करण्यात आले आहे. हत्तीच्या सोंडेतून कारंजा सदृश्य पाण्याच्या फव्वारे सोडले आहे. काल रात्री या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.