शिवनेरी वर शिवजन्मोत्सव सोहळा
यंदा कोरोनाचे प्रादुर्भाव कमी झाले आहे. कोरोनाची लाट ओसरत असल्याने यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने सर्व शिवभक्त प्रेमी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत आहे. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावरचे वातावरण शिवमय झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थळी असलेल्या शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा होत आहे. या वेळी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित आहे. 'जय शिवाजी जय भवानी' जय शिवराय ' चा जयघोष करत मोठ्या संख्येने शिवभक्त देखील उपस्थित आहे.
शिवनेरी ची सजावट फुलांनी करण्यात आली आहे. पोवाडे आणि मर्दानी खेळ सादर केले जात आहे. जन्मोत्सवासाठी बाळ शिवाजीचा पाळणा सजवला आहे. महिला पारंपरिक वेशभूषा करत पाळणा म्हणत आहे.उपमुख्यमंत्री हे पाळण्याची दोरी हातात घेऊन पाळणा हलवत आहे.आणि शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांची जयघोषणा करत आपल्या लाडक्या शिवरायाला मान वंदना देणारं आहे.