रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जुलै 2022 (21:42 IST)

डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर

D S Kulkarni
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम डी. एस. कुलकर्णी  आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी  यांना त्यांच्यावर २०१६ मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका केसमधे पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र डीएसके आणि त्यांच्या पत्नींवर इतर अनेक गुन्हे दाखल असुन त्याबाबतचे खटले सुरु असल्याने डी एस के पती- पत्नींना तुरुंगातच रहावं लागणार आहे.  
 
डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंतीने फ्लॅट खरेदीदारकांकडून आगाऊ रक्कम घेतली होती, मात्र खरेदीदारकाला फ्लॅटचा ताबा दिला गेला नव्हता. या प्रकरणी कुलकर्णींना २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याआधी २०१८ पासून ते न्यायालयीन कोठडीत होते. तेव्हापासून ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. परंतु आता पुणे न्यायालयाचे न्यायाधीश एस.के. डुगावकर यांनी त्यांचा जामीन अखेर मंजुर केला आहे.
 
वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्यासह त्यांचे कनिष्ठ अॅड. रितेश येवलेकर यांनी १३ ऑगस्ट २०१६ रोजी सिंहगड पोलीस स्टेशन, पुणे येथे नोंदवलेल्या एफआयआरमध्ये श्री. डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी श्रीमती हेमंती दीपक कुलकर्णी यांची बाजू मांडली. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट खरेदीदारांकडून आगाऊ रक्कम घेतली आणि फ्लॅटचा ताबा त्या खरेदीदारांना देण्यात ते जाणूनबुजून अयशस्वी ठरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.