सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जून 2020 (16:19 IST)

यंदा दहीहंडी रद्द, राम कदम यांचा निर्णय

कोरोनाच्या संकटामुळे भाजप आमदार राम कदम यांनी त्यांची घाटकोपर येथील दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ठाण्यामध्ये काही मोठ्या दहीहंड्या आयोजित केल्या जातात. त्यामध्ये राम कदम यांच्या घाटकोपर येथील दहीहंडीचा देखील समावेश आहे. त्यातच या दहीहंडीची किंमत देखील खूप मोठी असते. तसेच या दहीहंडीला बॉलिवूडचे सेलिब्रिटी देखील हजेरी लावत असताना त्यामुळे बऱ्याच गोविंदाच्या नजरा राम कदम यांच्या घाटकोपर येथील दहीहंडीकडे लागलेल्या असतात. विशेष म्हणजे या ठिकाणी मोठया प्रमाणात मुंबईकर देखील सेलिब्रिटींना पाहण्यासाठी येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे दहीहंडीला हजारो लोकांची जमा होणारी गर्दी लक्षात घेता घाटकोपरला होणारी आमची देशातील सर्वात मोठी दहीहंडी यावर्षी जनहिताच्या दृष्टीने रद्द करण्यात येत आहे, असे राम कदम यांनी जाहीर केले आहे.