शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 डिसेंबर 2022 (17:23 IST)

माणुसकीला काळिमा ! तरुणाचा रस्त्यावर तडफडत मृत्यू

death
माणुसकीला काळिमा फासणारी घटना संभाजीनगर येथे घडली आहे. रस्ता ओलांडताना तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे तो गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला तरुणाला जखमी अवस्थेत पाहून देखील कोणीही त्याच्या मदतीला आले नाही आणि सुमारे 20 मिनिटे तो तरुण तडफडत होता. रस्त्याने येजा करणाऱ्या एकही वाहनाने त्याला मदत केली नाही. बऱ्याच वेळानंतर काही वेळांन त्याला रुग्णालयात नेलं. तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मयत तरुणाचे नाव सुनील काळे असून तो एका चहाच्या दुकानात काम करायचा.

सदर घटना रविवारी सकाळची आहे. संभाजीनगरच्या आकाशवाणी चौकाजवळ सुनीलला रस्ता ओलांडताना एका वाहनाने जोरदार धडक दिली. या मुळे तो गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला आणि तडफडत होता. मात्र कोणीही त्याचा मदतीला आले नाही आणि त्याचा रस्त्यावरच मृत्यू झाला. ही घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुनीलला त्याच्या हॉटेलच्या मालकानं रुग्णालयात नेले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. सुनील घरातील एकमेक कमावणारा होता. घरात आई आणि आंधळी बहिणी ला सांभाळणारा आधार गेल्याच त्याच्या बहिणीने सांगितले. त्याला वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित त्याचा जीव वाचला असता .
 
 Edited by - Priya Dixit