शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (16:08 IST)

शाळेत न जाता खेळत-खेळत थेट शेततळ्यात गेलेल्या 3 मुलांचा मृत्यू

शेततळ्यात पाण्याचा अंदाज न आल्याने तीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथे सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यापैकी दोन भावंड होते. 
 
शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने गावावर शोककळा पडली आहे. दत्ता अनिल माळी वय 8 वर्ष, चैतन्य अनिल माळी वय 10 वर्ष, आणि चैतन्य शाम बर्डे वय 8 वर्ष अशी मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत.
 
दोघं भावंडांसह शाळेत जात असल्याचं चैतन्यने सांगितले. पण तिघे शाळेत न जाता खेळत-खेळत थेट शेततळ्यात पाणी खेळण्यासाठी तलावात उतरले. तिघांनाही पोहता येत नव्हतं म्हणून तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह तळ्यातून बाहेर काढले नंतर पंचनामा करुन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.