शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: धुळे , सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (17:46 IST)

कापसाच्या ढिगार्‍यामध्ये गुदमरून मुलाचा मृत्यू

खेळताना कापसाच्या दिगात अडकून गुदमरून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंगरगाव येथे घडली. कृष्णा योगेश पाटील 11 वर्षीय असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. कृष्णा हा आई वडिलांचा एकुलता ऐक मुलगा होता. या दुर्गटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 
 
कृष्णाचे आई वडिल कामासाठी शेतात गेले होते. घरात कृष्णा एकटा होता. तो कापसाच्या ढिगार्‍यावर खेळत होता. त्याने कापसाच्या ढिगात खड्डे केले होते. मात्र खेळता खेळता त्याचा तोल जाऊन त्या खड्यात तो डोक्यावर पडला आणि त्याला बाहेर निघता आले नाही. बराच काळ अडकून पडलेल्या कृष्णाचा कापसाच्या गाठीमध्ये गुदमरल्याने मृत्यू झाला.