देवीच्या विसर्जनाला गालबोट, नदीत बुडून दोघांचा दुर्देवी मृत्यू
देवी विसर्जनाच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पालीजवळ राबगाव येथे अंबा नदीत बुडून दोघांचा दुर्देवी अंत झाला.शिवेंद्र चौहान आणि विवेक लहाने अशी या मयत झालेल्या मुलांची नावे आहेत.हे दोघे देवीच्या विसर्जनासाठी गेले असताना दगडावरून पाय घसरून नदी पात्रात कोसळले आणि पाण्यात बुडून दोघांचा दुर्देवी अंत झाला.त्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.हे दोघे राबगाव येथील रहिवाशी होते.त्यांच्या गावात नवरात्रोत्सवात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. देवीच्या विसर्जनासाठी हे आलेले असताना ही दुर्देवी घटना घडली.