नांदेडमध्ये एसटी कर्मचारी आंदोलनस्थळी कर्मचाऱ्याचा मृत्यू
एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करण्यात यावे. या साठी एसटी कर्मचारी गेल्या काही दिवसापासून आंदोलन करत आहे. या आंदोलन दरम्यान काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी मागणी पूर्ण होण्यासाठी मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.नांदेडमध्ये हे आंदोलन सुरु असताना आंदोलनस्थळी नांदेडच्या एका एसटीच्या कर्मचाऱ्याला भोवळ आल्यामुळे अचानक ते कोसळून खाली पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिलीप वीर (50)असे मयत झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते नांदेडच्या आगारात वाहक पदावर कार्यरत होते नांदेड आगारातून 300 कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर त्यांना काल कामावर रुजू होण्यास सांगितले होते. परंतु ते कामावर हजर झाले नाही आपल्याला देखील निलंबित करण्यात येईल अशी भीती त्यांना वाटत असे, त्यामुळे ते तणावाखाली गेले होते. त्यांच्या मृत्यू नंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी त्यांचा मृतदेह बस स्थानकात आणून ठेवला.दिलीप वीर यांच्या पश्चात दोन मुलं आणि दोन मुली आहे. कर्मचारी आंदोलन सुरु असल्यापासून वेतन नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती कोलमडली होती. त्यामुळे ते तणावात होते. ते आंदोलनस्थळी येऊन भोवळ येऊन बेशुद्ध पडले. त्यांना रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे सांगितले आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या परिवारास त्यांच्या पश्चात राज्य शासन ने पन्नास लाखाची रोख मदत करावी.अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचारी संतप्त झाले आहे. त्यांनी मयत दिलीप यांचे मृतदेह बस स्थानकात आणून ठेवले आहे. आणि जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही मृतदेह हलविण्यात येणार नाही. असे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.