शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (08:31 IST)

एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही, आज घेणार निर्णय

राज्य सरकारने एसटीच्या कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढी दिली असली तरी एसटी कर्मचाऱ्यांनी अजूनही संप मागे घेतलेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर संप मागे घेतला जाईल, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. तसेच हे आंदोलन मुंबईतील आझाद मैदान, नाशिक, पुणे आणि सिंधुदुर्गमध्ये अद्यापही सुरू आहे. विलिनीकरणाशिवाय एसटीचा संप मागे घेणार नसल्याचं सांगितलं जात आहे. मुक्काम आझाद मैदानावर करू आज  संपावर निर्णय घेऊ, असे देखील सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
 
विलिनीकरणाबाबत उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ. असं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं होतं. परंतु अनिल परब यांनी ऐतिहासिक वेतनवाढ करत अद्यापही विनीकरणाबाबत निर्णय घेतलेला नाहीये. परंतु सरकारने दिलेला प्रस्ताव आम्ही सविस्तर ऐकून घेतला आहे. त्यामुळे आझाद मैदानात कर्मचाऱ्यांशी चर्चा करून पुढची भूमिका जाहीर करू असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. कुठल्याही कर्मचाऱ्यांनी वेगळं मत मांडू नये आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे. तो विचारविनीमय पद्धतीने घेतला जाईल. असं सदाभाऊ खोत म्हणाले.
 
सरकारचा निर्णय ऐकल्यानंतर आम्ही आता कामगारांसोबत बसून चर्चा करणार आहोत. त्यानंतर आमची भूमिका ठरवणार आहोत. आम्ही सर्व कामगारांच्या बाजूचा विचार करत उद्या जाहीर निर्णय घेऊ. परंतु आमची भूमिका जाहीर झालेली नाहीये. असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.