शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नवा विक्रम

महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या विक्रमाची नोंद केली आहे. मुख्यमंत्रिपद सर्वाधिक भूषवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत वसंतराव नाईक यांना वगळता महाराष्ट्रात झालेल्या आधीच्या सर्व मुख्यमंत्र्यांना मागे टाकलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 6 डिसेंबर 2018 रोजी मुख्यमंत्रिपदाची 1 हजार 498 दिवसाचा कार्यकाळ पूर्ण करत, वसंतराव नाईकांनंतर सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होण्याचा विक्रम नोंदवला.
 
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात एकूण 17 मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 18 वे मुख्यमंत्री आहेत. यापैकी आतापर्यंत दिवंगत वसंतराव नाईक हे सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या खालोखाल दिवंगत विलासराव देशमुख हे होते. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतरावांना वगळता इतर 16 मुख्यमंत्र्यांना मागे टाकलं आणि दुसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे.
 
सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहणारे पाच मुख्यमंत्री!
 
वसंतराव नाईक – सलग 4 हजार 97 दिवस मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस – सलग 1 हजार 498 दिवस मुख्यमंत्री
विलासराव देशमुख – सलग 1 हजार 494 दिवस मुख्यमंत्री
मनोहर जोशी – सलग 1 हजार 419 दिवस मुख्यमंत्री
शरद पवार – सलग 1 हजार 98 दिवस मुख्यमंत्री