गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जानेवारी 2024 (10:15 IST)

साईबाबांना अनोखी गुरुदक्षिणा; भक्ताकडून 29 लाखांचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला नेहमीच भक्तांची गर्दी पाहायला मिळते. देशविदेशातून असंख्य भक्त साईचरणी लीन होण्यासाठी येत असतात. साईचरणी लीन झालेला भक्त आपापल्या परीने वस्तू किंवा रोख रकमेचे दान देत असतो. अशातच बँगलोरमधील एका भक्ताने तब्बल 29 लाखांचा सोन्याचा मुकुट साईचरणी दान केला आहे.
 
शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला नेहमीच भक्तांची गर्दी पाहायला मिळते. शिर्डी साई बाबांच्या दर्शनाला देशविदेशातून दररोज असंख्य भक्त साईचरणी लीन होण्यासाठी येत असतात. यामधील बहुतेक भाविक हे रोख स्वरुपात किंवा सोने- चांदीच्या स्वरुपात मोठे दान देत असतात.
 
अशातच आज बेंगलोरमधील राजाराम कोटा यांच्या परिवाराने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी कोटा परिवाराकडून तब्बल 29 लाख रूपये किमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबा चरणी अर्पण करण्यात आला. कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवले यांच्याकडे हा मुकूट सुपूर्द करण्यात आला. आज साईंच्या मुर्तीवर हा मुकूट चढवण्यात आला होता.
 
Edited By - Ratnadeep ranshoor