शनिवार, 24 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 एप्रिल 2023 (14:18 IST)

देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाश्यांचा हल्ला,दोघांचा मृत्यू

देवदर्शनाला गेलेल्या भाविकांवर अचानकपणे मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात सातबहिणींचा डोंगर येथे घडली आहे. या डोंगरावर महादेवाचे मंदिर आहे. मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनाला येतात. हा डोंगर अवघड आहे. इथे मधमाश्यांचे मोठ्या प्रमाणात पोळे आहे. दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला.हे दोघे वृद्ध घाईघाईत डोंगरावरून खाली उतरू शकले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. अशोक मेंढे आणि गुलाबराव पोचे असे मयतांची नावे आहेत.त्यांचे मृतदेह रात्री उशिरा स्वयंसेवी संस्था कार्यकर्त्यांच्या मदतीने खाली आणले. तर चार भाविक जखमी झाले . 

Edited By - Priya Dixit