शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 9 एप्रिल 2023 (13:43 IST)

महाराष्ट्र आरोग्य विभागात मेगा भरती

girish mahajan
महाराष्ट्रात नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी या साठी राज्य सरकारने आरोग्य विभागात भरती करण्याचा निर्णय घेतला असून या साठी घेतली जाणारी परीक्षा आणि निवड पद्धती वादात पडून त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लावण्यात आला. राज्य स्तरीय 'अवयवदान जन जागृती अभियान' चे उदघाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते छत्रपती संभाजी नगर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पार पडले.

त्यावेळी बोलताना महाजन म्हणाले, सध्या लोकसंख्या जास्त आणि डॉक्टरांची संख्या कमी आहे.देशभरात राज्यात काही कारणास्तव अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अवयव वेळीच न मिळाल्यामुळे रुग्ण दगावतात. तसेच समाजात अजून देखील अवयवदान करण्याबाबत लोकांमध्ये काही गैरसमज आहे. त्यामुळे लोक अवयवदान करत नाही. त्यामुळे अवयवदान जन जागृती अभियान राबविले जात आहे. या साठी जनतेचे मोलाचे योगदान अपेक्षित आहे. या अंतर्गत येत्या काळात जिल्हा निवड समितीच्या मार्फत 4500 पदासाठी भरती करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या वेळी जास्त प्रमाणात डॉक्टर व्हावे त्यासाठी ज्यादा मेडिकल कॉलेज उघडले जातील, औषधींसाठी मोठ्या फंडाची उभारणी  तसेच ग्रामीण भागात जाऊन अवयवदानाची जन जागृती करण्याचे त्यांनी सांगितले.येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती केली जाईल. या वेळी कार्यक्रमाला विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते. अंबादास दानवे यांनी या वेळी आपले शरीर दान करण्याची  घोषणा केली .      
 
Edited By - Priya Dixit