गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (07:09 IST)

औरंगाबादनंतर, उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव

काही दिवसांपुर्वी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनंगर असा सीएमओ ट्विटर हँडलवर उल्लेख राजकीय वादळ उठले होते. आता हा वाद ताजा असतानाच पुन्हा उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आला आहे. 
 
सीएमओकडून उभय शहरांचा उल्लेख संभाजीनगर आणि धाराशिव झाला असला तरी त्यासाठी कोणतीही शासकीय अधिसूचना निघालेली नाही किंवा तशी चर्चाही झालेली नाही. दोन्ही शहरांचे नावे बदलण्यावर शिवसेना ठाम आहे. शिवसेनेकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करण्यात येतो. तसाच उल्लेख उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा केला जातो.