मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जानेवारी 2018 (09:15 IST)

धर्मा पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात विष प्राशन केलेले 84 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केले. योग्य मोबदल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही, आणि धर्मा पाटील यांना शहीद शेतकरी घोषित करत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी मुंबईतील जे जे रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरु केलं आहे. यामुळे आता सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. 

 धर्मा पाटील यांच्या मुलाला लेखी आश्वासन दिलं आहे. जमिनीचं फेरमूल्यांकन करुन पंचनाम्यानुसार जो मोबदला येईल तो व्याजासह 30 दिवसात देऊ, असं सरकारच्यावतीने म्हटलं आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचं पत्र धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र यांना दिल आहे. 

धर्मा पाटील यांच्या मुलानं हॉस्पिटलच्या आवारातच आंदोलन सुरु केलं असून त्यांची भेट घेण्यासाठी काही वेळापूर्वीच मंत्री जयकुमार रावल आणि गिरीश महाजन जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.