दिवाळीची सुट्टी १४ दिवस
कोरोनामुळे सुरु असलेल्या ऑनलाइन वर्गांना दिवाळीची सुट्टी ५ दिवसच दिल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या. आता सुट्टीत वाढ करत ही सुट्टी १४ दिवसांची केली आहे.
दिवाळीच्या सुट्टीत वाढ करावी या मागणीचा विचार करून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारपासून म्हणजेच ७ नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२० पर्यत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ५ नोव्हेंबर २०२० मधील परिपत्रकानुसार १२ नोव्हेंबर २०२० ते १६ नोव्हेंबर २०२० अशी सुट्टी देण्यात आली होती. यात आता बदल करून १४ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.