डॉ.लहाडे शरण,पाच दिवस पोलिस कोठडी
नाशिकमधील बेकायदा गर्भपात प्रकरणी आरोपी असलेल्या डॉ.वर्षा लहाडे सरकारवाडा पोलिस स्टेशन येथे पोलिसांना अखेर शरण आल्या आहेत. त्यांना पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता कोर्टाने पोलिसांचे मागणी मान्य करत ऐकूण पाच दिवस 2 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
त्यांनी कोर्टात अटकपूर्व जामीन मिळावा या करिता अर्ज केला होता मात्र तो कोर्टात अनेक कारणांनी त्यावर सुनावनी टळली होत. तर गुन्हा इतक्या गंभीर स्वरूपाचा आहे की हा जामीन अर्ज मंजूर होणार नाही हे डॉ.लहाडे यांना लक्षात आले होते. त्यामुळे त्या स्वतः पोलिसांना शरण आल्या आहेत.