गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019 (16:34 IST)

पंचनाम्याला विलंब करू नका, मोबाइलवरुन फोटो अपलोड करा

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी यंत्रणेला पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सदरच्या पंचनाम्याला विलंब लागत असेल तर शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाइल फोनवरुन फोटो अपलोड केले तरी चालतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. 
 
आता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलवली असून कशा स्वरुपाची तात्काळ मदत करता येईल, काय अतिरिक्त मदत देता येईल त्यादृष्टीने निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडेही मदतीची मागणी करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांचं हातातलं पीक वाया गेल्यामुळे दु:ख आहे. पालकमंत्री, आमदारांनी आपापल्या भागांना भेट द्यावी. सरकार हा विषय अत्यंत गांभीर्याने हाताळणार असल्याचे सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं असून ५३ हजार हेक्टरमध्ये फळपिकांचं नुकसान झालं आहे. कोकणात ४६, नाशिकमध्ये ५२ आणि नागपूरमध्ये ४८ तालुके बाधित झाले आहेत.