तब्बल 30 जेसीबींमधून गुलाल उधळून करणार रोहित पवारांचे स्वागत  
					
										
                                       
                  
                  				  राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या भव्य स्वागतासाठी जामखेडमधून काढण्यात येणाऱ्या विजयी मिरवणुकीत तब्बल 30 जेसीबीच्या फाळक्यातून गुलाल उधळला  जाणार आहे. यासाठी प्रत्येक चौकात एक जेसीबी उभा करण्यात आला आहे.
				  													
						
																							
									  
	 
	निवडून आल्यानंतर रोहित पवार पहिल्यांदाच जामखेड शहरात दाखल होत आहेत. जनतेचे आभार मानण्यासाठी रोहित पवार आपल्या मतदारसंघात येणार आहेत. आभार मानल्यानंतर रोहित पवार यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जेसीबीतून गुलाल उधळण्याची नवी पद्धत आणली आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीत विजय मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या फाळक्यातून गुलाल उधळत सेलिब्रेशन केलं होतं. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ट्रेण्ड झालेल्या ‘जेसीबी की खुदाई’ या हॅशटॅगनंतर आता ‘जेसीबी मे सेलिब्रेशन’  ट्रेण्डिंगमध्ये दिसत आहे.