मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: औरंगाबाद , मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (12:11 IST)

खडसेंना हायकोर्टाचा अजून एक दणका

भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. खडसेंच्या तक्रारीवरून मुकताईनगर पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाने रद्द केला आहे. 
 
औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती नलावडे आणि विभा कंकनवाडी यांच्यासमोर  या प्रकरणावर सुनावणी झाली. दमानिया यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे. दमानिया व इतर पाचजणांनी हायकोर्टात खडसेंविरोधात आर्थिक गैरव्यवहार केल्याबद्दल डिसेंबर 2016 ध्ये एक याचिका दाखल केली होती.