राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध ईडी कडून पुरवणी आरोपपत्र दाखल
Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहे. ईडी ने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात रोहित पवार यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. रोहित पवार यांची ईडीने अनेक तास चौकशी केली.
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) मुंबईतील विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाने अद्याप आरोपपत्राची कोणतीही दखल घेतलेली नाही.
जानेवारी 2024 मध्ये ईडीने रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो आणि इतर संबंधित जागेवर धाड टाकली असून त्यांना ईडीच्या मुंबईतील कार्यालयात बोलवून चौकशी करण्यात आली. मार्च 2023 मध्ये, ईडीने बारामती अॅग्रोशी संबंधित 50.20 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती केली होती. यामध्ये औरंगाबादच्या कन्नड येथे असलेली 161.30 एकर जमीन, एक साखर कारखाना, यंत्रसामग्री आणि इमारतींचा समावेश आहे.
रोहित पवार हे कर्जत-जामखेडचे आमदार आहेत आणि शरद पवार यांचे नातू आहेत. रोहित हा शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार आणि त्यांची पत्नी सुनंदा यांचा मुलगा आहे. अलिकडेच मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (पीएमएलए) अंतर्गत मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी ईडीने रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीची 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली होती.
ईडीचा दावा आहे की या मालमत्ता कन्नड सहकारी सख कारखाना लिमिटेड (कन्नड एसएसके) च्या आहेत, ज्या बारामती अॅग्रोने कथितपणे गैरव्यवहार केलेल्या लिलावाद्वारे विकत घेतल्या होत्या. ईडीच्या मते, हे अधिग्रहण पीएमएलए कायद्याचे उल्लंघन आहे.
ईडीने म्हटले आहे की या प्रकरणाशी संबंधित 121.47 कोटी रुपयांच्या मालमत्तेची जप्ती करण्यासाठी आतापर्यंत तीन तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत. एजन्सीचे म्हणणे आहे की जप्तीची अंतिम पुष्टी झाली आहे आणि विशेष पीएमएलए न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Edited By - Priya Dixit